ॲड राजीव बिले यांना कोकणरत्न पदवी प्रदान…

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळचे प्रख्यात वकील ॲड राजीव दत्ताराम बिले यांना स्वतंत्र कोकणराज्य अभियानांतर्गत कोकणरत्न पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. हा पदवीप्रदान सोहळा मुंबई येथील आझाद मैदान मराठी पत्रकार भवन येथे संपन्न झाला.
यावेळी स्वतंत्र कोकणराज्य अभियानचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे, वरिष्ठ पत्रकार व संपादक सचिन कळझुनकर, मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर,युवानेते सचिन गावडे, खजिनदार राजेंद्र सुर्वे, अजित गोरूले, बापू परब, मुकेश जय, निहार कोकरे, अनिकेत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
ॲड राजीव बिले गेली अनेक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक व आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेत कार्यरत आहेत. अंधश्रध्दा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग चे अध्यक्ष आहेत,रोटरी क्लब ऑफ कुडाळचे संस्थापक अध्यक्ष व रोटरी सेवाप्रतिष्ठान कुडाळचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या या अतुलनिय सामाजिक कार्याची दखल स्वतंत्र कोकणराज्य अभियान या संस्थेने घेत त्यांना मानाची कोकणरत्न पदवी प्रदान करण्यात आली.
ॲड राजीव बिले यांनी कोकणरत्न पदवी आपणास प्राप्त झाली हि खुप मोठी गोष्ट आयुष्यात समाधान देणारी आहे अशी प्रतिक्रिया देऊन स्वतंत्र कोकणराज्य अभियान संस्थेचे आभार व्यक्त केले.

You cannot copy content of this page