*मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची शिवसेना नेते अतुल बंगे यांच्यावर टीका*
*💫कुडाळ:*- शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यापासून पदाच्या आशेवर असणारे अतुल बंगे यांनी दिखावे गिरीसाठी आपल्या लोकप्रतिनिधींचा खोटा अभिमान बाळगण्यापेक्षा सामान्य जनतेचे प्रलंबित प्रश्न सुटले का ते जाणुन घ्यावे अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे. याबाबत त्यानी प्रसिद्धपत्रक दिल असून त्यात त्यांनी अस म्हटल की आपले आमदार ,खासदार आणि पालकमंत्री आणि आपण जाहीर करता की कोट्यावधीचा निधी रस्ते विकासासाठी आला तो प्रत्यक्षात आला की नुसताच कागदावर तेही कागदोपत्री जाहीर करावे. आणि खरच कोट्यावधीचा निधी रस्ते विकासासाठी आला असेल तर मग सध्याची गरज आणि प्राथमिकता असलेल्या आरोग्य सुविधा यासाठी निधीची कमतरता का. नुसती रस्त्यांच्या निधीची घोषणा करता आणि श्रेय घेता मग जिल्ह्यात सुमारे साडे चारशे लोक कोरोनाच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे मृत्युमुखी पडले ते पण अपयश आपल्या नेत्यांनाच जाते.असा ही सवाल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी विचारला आहे.
