Headlines

पावशी-घावनळेफाटा अपघातप्रवण लेनवर अखेर प्रशासनाची कारवाई सुरू…

पप्या तवटे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर महामार्ग प्रशासनाला जाग; तात्पुरत्या उपाययोजनांना आजपासून सुरुवात..

⚡कुडाळ ता.२१-: पावशी – घावनळेफाटा येथे बाॅक्सेलजवळील मुंबई गोवा महामार्गाच्या अपघात प्रवण लेनवर आजपासून तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करण्याचे काम प्रशासनाकडून होती घेण्यात आले आहे. पावशीचे माजी सरपंच श्रीपाद उर्फ पप्या तवटे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अखेर महामार्ग प्रशासनाला जाग आली.

त्या ठिकाणच्या लेनवर पावसाळ्यात महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. तसेच रस्त्याच्या तांत्रिक दोषांमुळे वाहनांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या तीन वर्षांत याच ठिकाणी ४० हून अधिक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या धोकादायक ठिकाणाबाबत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. महामार्गाची तांत्रिक पाहणी करून अपघातांची कारणे शोधून तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी पावशीचे माजी सरपंच श्रीपाद (पप्या) तवटे यांनी केली. येत्या आठ दिवसांच्या आत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून योग्य उपाययोजना कराव्यात, अन्यथा महामार्गावर जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पप्या तवटे यांनी दिला होता.
त्यांच्या या आंदोलनाच्या इशा-याने महामार्ग प्रशासन खडबडून जागे झाले असून, आजपासून या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याची लेन रफ करण्यासह आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे.

You cannot copy content of this page