शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने कुडाळ येथे १४ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन !

*रक्ताचा कोठेही तुटवडा होऊ नये म्हणून तरुणांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान करण्याचे आवाहन!*

*💫कुडाळ दि.१३-:* शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने शुक्रवार दिनांक १४ मे २०२१ रोजी सकाळी ९ वाजता श्री देव मारुती मंदिर धर्मशाळा, बाजारपेठ, कुडाळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याबद्दल माहिती देताना शिवप्रेमी सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री. रमाकांत नाईक म्हणाले की, लस घेवुन स्वतःला सुरक्षित ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे, पण रक्तदान करून दुसऱ्याला सुरक्षित करणे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे. सध्या १८ ते ४५ वयोगटातील लसीकरण सुरु झालेले आहे. लस घेतलेल्या युवकांना दुसरी लस घेतल्यानंतर १४ दिवस म्हणजेच एकूण ४२ ते ५० दिवस रक्तदान करता येणार नाही. रक्तदाते हे १८ ते ४५ वयोगटातील जास्त असल्याने पुढील काही महिने रक्ताचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने लस घ्यायच्या अगोदर रक्तदान करावे, असे आवाहन शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page