सर्वात आधी स्थानिकांना लस उपलब्ध करून द्या

*मनसे सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष सुधीर राऊळ यांची प्रसिद्धीपत्रकाद्वारे तहसीलदारांकडे मागणी

*💫सावंतवाडी दि.११-:* सावंतवाडी तालुक्यात ०५ मे रोजी जनता कर्फ्यू घोषित केल्यामुळे नागरिकांनी आदल्या दिवशी जी बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, त्यामुळे पुढे रुग्णसंख्येत वाढ झाली तर आश्चर्य वाटायला नको, शनिवारी (८मे रोजी) सावंतवाडी तालुक्यामध्ये २०४ रुग्ण भेटले त्यातील सर्वाधिक रुग्ण १८१ हे ग्रामीण भागातील होते त्यामुळे शासनाने याचा विचार केला पाहिजे, अशी मागणी मनसे सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष सुधीर राऊळ यांनी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. प्रसिद्धी पत्रकात राऊळ यांनी म्हटले आहे की आज गावागावांमध्ये जे रुग्ण भेटत आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र सावंतवाडीमध्ये बेड उपलब्ध करून द्यावेत कारण आज काहीजणांना होम आयसोलेशन करावे लागते, परंतु घरात स्वतंत्र जागा नसल्यामुळे व भेटणारे रुग्ण ग्रामीण भागातील भर वस्तीतील असल्याने कुठेतरी आसपासच्या लोकांच्या मनात एक भीती निर्माण झालेली आहे.जनता कर्फ्यूचे नियोजन हे पूर्णपणे चुकीचे ठरले आहे. यासाठी शहरांमध्ये व गावांमध्ये ज्या ठिकाणी मंगल कार्यालय आहेत त्या ठिकाणी बेडची उपलब्धता करून रूग्णांवर त्याठिकाणी उपचार करावेत जेणेकरून आरोग्य यंत्रणेवर ताण पडणार नाही. ही राजकारण करण्याची वेळ नाही, परंतु ज्याप्रमाणे रुग्ण संख्या वाढत आहेत. ऑक्सिजनसाठी सावंतवाडीमध्ये बेड उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत गोरगरीब जनतेची यातून लवकरात लवकर सुटका करावी. लसीकरण करताना स्थानिक लोकांना अगोदर लस उपलब्ध करून द्या. ४४ वर्षाच्या वरील नागरिकांना पहिला डोस पाजल्यावर ४५ दिवस पूर्ण झाल्यावर दुसरे डोस उपलब्ध करा. ग्रामीण भागात नेटवर्कचा मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम असल्याने ऑनलाईन लसीकरणात मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे, त्याकडे लक्ष द्या. तसेच इतर राज्यातून येणाऱ्या लोकांना अगोदर रोखा, अशा विविध मागण्या राऊळ यांनी प्रसिद्धी पत्रकात केल्या आहेत.

You cannot copy content of this page