*💫सावंतवाडी दि.१२-:* शहराच्या सामाजिक आणि राजकीय कार्यातील एक अग्रण्य नाव म्हणजेच महेंद्र सांगेलकर . कर्नल सुधीर सावंत यांच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांनी समाजकारणात आणि राजकारणात कार्य करण्याचा निर्णय घेतला. कर्नल सुधीर सावंत यांना आपले आदर्श मानत त्यानी कॉलेज जीवनापासूनच सामाजिक आणि राजकीय कार्य करण्यास सुरू केले. कॉलेज मध्ये असताना एन.एस.यु.आय. मधून त्यानी आपल्या राजकीय कार्यास सुरुवात केली. त्यानंतर आता पर्यंत गेली १९ वर्ष कॉंग्रेस पक्षाचे निष्ठेने काम करत आहेत. गरीब जनतेच्या अडीअडचणीच्या वेळी धावून जाऊन त्यांना नेहमी मदत करत असतात. आतापर्यंत ५० वेळा रक्तदान करून त्यांनी अनेक रुग्णाचे प्राण वाचवले आहेत. तसेच आतापर्यंत २ हजार लोकांन मध्ये रक्तदानाची जनजागृती करून त्यांच्याकडून रक्तदान करून घेतले आहे. कॉलेज मध्ये असून आणि वय सुध्दा कमी असताना कॉंग्रेस पक्षाचे कार्य निष्ठेने आणि प्रामाणिक पणे करत असल्यानेच, मा.कर्नल सुधीर सावंत, मा.दिलीप नार्वेकर, मा.विजय नाईक, मा. रमाकांत सावंत, मा.पी.एफ.टान्टस, मा.विलास गावडे, मा. सुनील राऊळ या सर्वांचा आवडता कार्यकर्ता म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख प्राप्त केली होती आणि ती ओळख आज ही आहे. कॉंग्रेस पक्षाने केलेल्या अनेक संघर्षात , जनतेसाठी केलेल्या अनेक आंदोलनात त्यानी सक्रिय सहभाग घेतला होता. ही आंदोलने करताना त्यानी पक्षासाठी अनेक पोलिस केसेस स्वतःच्या अंगावर देखील घेतली आहेत.१९ वर्ष कॉंग्रेस पक्षात आत्मीयतेने, निष्ठेने आणि प्रामाणिक पणे करत असलेल्या कामाची पोच पावती म्हणून कॉंग्रेस पक्षाने त्यांच्या खांद्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विधानसभा युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन जिल्ह्याची जबाबदारी सोपवली होती. आणि ती जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली. त्याचेच फलित म्हणून जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, माजी नगराध्यक्ष अँड दिलीप नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कार्यामुळे कॉंग्रेस सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदी त्यांची वर्णी लागली आहे. आज सावंतवाडी तालुकाध्यक्ष म्हणून ते निस्वार्थी वृत्तीने काम करत आहेत. राजकारणा सोबतच आपल्या सामाजिक कार्यामुळे ते सावंतवाडी तालुक्यांतीलच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. आपल्या सारख्या युवा वर्गाला सोबत घेऊन काम करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळेच युवा वर्ग त्यांच्या सोबत जोडला गेला आहे. राजकारण करताना देखील कोणत्याही पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ता यांच्या बद्दल मनात द्वेष किंवा राग न ठेवता त्यानी मैत्रीपूर्ण काम केले आहे आणि आजही करत आहेत. त्यांच्या याच वृत्तीमुळे अनेक पक्षातील राजकीय पदाधिकाऱ्यांशी तसेच कार्यकर्त्या सोबत त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. प्रशासन, पोलिस व्यवस्था, कायदा सुव्यवस्था यांची योग्य प्रकारे जाण आणि अभ्यास असल्याने चुकीचे वागणाऱ्या अधिकाऱ्यास जागेवर गप्प करण्याचे सामर्थ्य त्यांच्या वाणीत आहे. आणि त्यांच्या याच बेधडक वागण्यामुळे त्यानी अन्यायग्रस्थ लोकांना न्याय मिळवून दिला आहे. अनेक संकटाच्या काळात त्यांनी गरजू व्यक्तींना साथ दिली आहे. तशीच साथ ते आज ही देत आहेत. कोरोना सारख्या कठीण काळात सर्वत्र लॉक डाऊन असताना त्यांनी अनेक कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा करत आपली दातृत्वाची भावना जपली आहे. त्याच बरोबर त्यानी भुकेलेल्या प्राणीमात्रांना देखील मायेचा हात पुढे करत त्यांना देखील अन्न पुरवले आहे. राजकारणा सोबत समाजाची सेवा करणाऱ्या या युवा नेत्यास ग्लोबल महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज कडून वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…
राजकारणाबरोबरच समाजकारणातील सच्चा कार्यकर्ता-:महेंद्र सांगेलकर..!
