बांदा ता. १२-: बांदा ते शेर्ले मार्गावरील पुलावर अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांना पकडण्यात बांदा पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ₹17,59,200 किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, चौघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
दि. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ६.०० वाजता बांदा-शेर्ले पुलावर ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी आरोपींकडून पांढऱ्या रंगाची टोयोटा इनोव्हा क्रिस्टा (MH 08 AG 1221) ही ₹15 लाख किंमतीची गाडी तसेच हॅवर्ड्स फाईन व्हिस्की या गोवा बनावटीच्या 180 मिलीच्या 48 बाटल्या असलेले एकूण 60 बॉक्स — अशा अंदाजे ₹2,59,200 किमतीच्या दारूचा साठा असा एकूण ₹17,59,200 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही दारू गोव्याहून सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेकायदेशीररीत्या आणली जात असल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. या प्रकरणी बांदा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
