मालवणात भाजपाचा उबाठाला धक्का : उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश…

⚡मालवण ता.१२-:
मालवणात भाजपने उबाठा शिवसेनेला धक्का दिला आहे. मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर मालवण शहर देऊळवाडा ठाकरे सेनेचे कार्यकर्ते सुहास वालावलकर, सुवर्णा वालावलकर व दिपाली बांदेकर या तिघांनी पालकमंत्री नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

ओरोस येथील सिंधुदुर्ग भाजपा कार्यालय येथे हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, मालवण शहर मंडळ तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page