राजू कासकर:बिल्डर लॉबीने बांधलेल्या बिल्डिंग वगळता सावंतवाडीचा असा कोणता विकास महायुतीने केला..?
⚡सावंतवाडी ता.१२-: युती होवो ना व्होवो पण येत्या निवडणुकीत महायुतीचा पराभव हा अटल आहे. बिल्डर लॉबीने बांधलेल्या बिल्डिंग वगळता सावंतवाडीचा असा कोणता विकास झाला हे दाखवा, असा सवाल मनसेचे शहराध्यक्ष राजू कासकर यांनी उपस्थित केला आहे.
सावंतवाडीतील जनता सरकारच्या विरोधात असून येत्या निवडणुकीत जनताच महायुतीला त्यांची जागा दाखवून देतील व महायुतीचे सर्व नगरसेवक घरी बसतील व आमचा एकतर्फी प्रचंड मताधिक्यांनी विजय होईल, असा विश्वासही कासकर यांनी व्यक्त केला.
कासकर म्हणाले, महायुतीच्या काळात सावंतवाडीत विकास शून्य टक्के झाला आहे. सावंतवाडीतील कोणतेही काम पूर्ण न करता फक्त घोषणाबाजी करून सावंतवाडीकर आता मुर्ख होणार नाहीत. सावंतवाडीचा विकास पाहता येत्या निवडणुकीत जनताच महायुतीला त्यांची जागा दाखवून देतील व मतपेटीतून उत्तर देतील. त्यामुळे येत्या निवडणुकीत आमचा एकतर्फी विजय हा निश्चित असून महायुतीचे सर्व नगरसेवक घरी बसतील असा विश्वास कासकर यांनी व्यक्त केल.
