सातुळी-बावळाट ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रशांत सुकी यांचा भाजपा मध्ये प्रवेश…

⚡ओरोस, ता..०२-:
सातुळी-बावळाट ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तसेच उबाठाचे प्रमुख पदाधिकारी प्रशांत सुकी यांनी कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे यांच्या प्रयत्नातून तसेच जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि आंबोली मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ यांच्या उपस्थितीत ओरोस येथील भाजप जिल्हा कार्यालयात हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला.

या प्रसंगी श्री. सुकी म्हणाले, “भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध आणि संघटनेच्या ध्येय-धोरणाशी निष्ठावान राहणारा पक्ष आहे. या पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या हितासाठी सातत्याने कार्यरत राहणे हे आमचे ध्येय आहे. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

या वेळी माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल बांदेकर, ॲड. सुमित सुकी, अजिंक्य सुकी, हर्षवर्धन सुकी, प्रसाद सुकी, अमर मोर्ये, केतन उर्फ बंटी अजगावकर यांनीही भाजपा प्रवेश केला.यावेळी, चौकूळ सरपंच गुलाबराव गावडे, गेळे सरपंच सागर ढोकरे, शक्तिकेंद्र प्रमुख भिवा सावंत, ॲड. विठ्ठल परब, केसरी विकास सोसायटीचे संचालक दिप्तेश सुकी, निहाल शिरसाट यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच विलवडे पंचायत समितीतील कार्यकर्त्यांनीही उपस्थिती दर्शवली.

You cannot copy content of this page