बांदा सटमटवाडी येथे भरधाव मोटारचा अपघात ..

गतिरोधकाचा अंदाज न आल्याने दोन वाहनांना धडक; सुदैवाने जीवितहानी टळली..

बांदा/प्रतिनिधी
मुंबई गोवा महामार्गावर बांदा सटमटवाडी येथे रस्त्यावरील गतिरोधकाचा अंदाज न आल्याने भरधाव वेगात मोटारीने दोन वाहनांना धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र दुचाकी व दोन मोटारिंचे नुकसान झाले. हा अपघात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाला.
अपघातग्रस्त मोटार भरधाव वेगात पुण्याहून गोव्याच्या दिशेने जात होती. रस्त्यावर गतिरोधकाचा अंदाज न आल्याने मोटारीची समोरील दुचाकीला जोरदार धडक बसली. दुचाकी त्याच्या पुढे असलेल्या मोटारीवर जाऊन आदळली. यामध्ये दुचाकी चालकाला किरकोळ दुखापत झाली. वाहनांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

You cannot copy content of this page