⚡सावंतवाडी ता.०२-: मळगाव येथील जागृत देवस्थान श्री देव रवळनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार ५ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
यानिमित्त सकाळपासून मंदिरात पूजा, अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद, त्यानंतर केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री मंदिरासमोर दीपोत्सव होणार असून त्यानंतर तरंगांसहीत भव्य पालखी प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. पालखीनंतर स्थानिक दशावतार नाट्यमंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जत्रोत्सावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.
मळगाव येथील रवळनाथ देवाचा ५ नोव्हेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव…
