सदगुरू प्रासादिक भजन मंडळ अणसुर द्वितीय तर श्रीदेव लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ कणकवली तृतीय..
⚡सावंतवाडी ता.०२-: श्री देव दाडोबा देवस्थान व ग्रामस्थ मंडळ दांडेली आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत पाट कुडाळ येथील श्री रामकृष्ण हरी सेवा संघभजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला.
३१ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दांडेली (श्री देव दाडोबा देवस्थान प्रवेशद्वार जवळ) येथे भजन मंडळ व भजन रसिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात ही भजन स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेतील निकाल पुढील प्रमाणे:-
प्रथम क्रमांक:- श्री रामकृष्ण हरी सेवा संघ पाट, कुडाळ बुवा श्री आशिष सडेकर, द्वितीय क्रमांक:- श्री सदगुरू प्रासादिक भजन मंडळ अणसुर बुवा हर्षल मेस्त्री, तृतीय क्रमांक श्री देव लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ कणकवली
तसेच वैयक्तिक पारितोषिके
उत्कृष्ट हार्मोनियम:- बुवा श्री. योगेश मेस्त्री.(श्री देव लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ कणकवली), उत्कृष्ट गायक:- बुवा श्री आशिष सडेकर (श्री रामकृष्ण हरी सेवा संघ पाट, कुडाळ), उत्कृष्ट पखवाज:- शुभम गावडे. (श्री रामकृष्ण हरी सेवा संघ पाट, कुडाळ), उत्कृष्ट तबला:- ओंकार मेस्त्री, (श्री सदगुरू प्रासादिक भजन मंडळ अणसुर), उत्कृष्ट झांजवादक:- सिद्धेश चव्हाण. (महापुरुष प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी.), उत्कृष्ट कोरस:- श्री सदगुरू प्रासादिक भजन मंडळ अणसुर, शिस्तबद्ध संघ:- सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ,जानवली यांनी मिळविला.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून दीप्तेश मेस्त्री व भावेश राणे यांनी काम पाहिले. अवकाळी पाऊस असून सुद्धा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते,ग्रामस्थ यांनी मोठी मेहनत घेतली.
