महायुतीमध्ये कुठलाही मिठाचा खडा पडू नये हीच माझी भूमिका…

आमदार दीपक केसरकर:एका मतदार संघात “चार-चार उमेदवार इच्छुक होऊ लागले तर माझाही नाईलाज होईल, त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकमेकांना समजून घ्यावे..

⚡सावंतवाडी, ता. ३०-:
राज्यात आपण एकत्रित सत्तेत असल्याने आमची युती मोडलेली नाही. आम्ही शेवटपर्यंत महायुतीत राहणार आहोत. मात्र, वेळ आली तर स्वबळावर लढण्याचीही तयारी ठेवलेली आहे. तरी सुद्धा युतीमध्ये कुठलाही मिठाचा खडा पडू नये, असं मला वैयक्तिकरित्या वाटतं, असे प्रतिपादन आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे केले.
ते सावंतवाडी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

केसरकर म्हणाले, एका मतदार संघात “चार-चार उमेदवार इच्छुक होऊ लागले आणि त्यातून नाराजी निर्माण झाली, तर माझाही नाईलाज होईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकमेकांना समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.”
“कार्यकर्त्यांनी एकमेकांची मनं जुळवली पाहिजेत. तसं झालं, तर आपला विजय शंभर टक्के निश्चित आहे. आज तुमच्या निवडणुका आहेत. ज्या प्रकारे तुम्ही माझ्या निवडणुकीत प्रचार केला, तसाच मीही तुमच्या निवडणुकीत प्रचार करणार आहे. म्हणून जी काही मतभेद आहेत, ती बाजूला ठेवून सर्वांनी एकजुटीने पक्षासाठी काम करावं.” असे आव्हान केसरकर यांनी कार्यकर्त्यांना केले.

तसेच, “आज अनेक जण पक्षात येण्यास इच्छुक आहेत. त्यांना कसे आणायचे हे तुम्ही ठरवा. शिवसेना वाढली पाहिजे, या उद्देशाने काम करा,” असे आवाहनही आमदार केसरकर यांनी कार्यकर्त्यांना केले.

You cannot copy content of this page