केसरकरांच्या माध्यमातून मतदारसंघात कोट्यावादींची विकास काम, त्यामुळे मीच आणलं म्हणणाऱ्यांनी काहीच आणलं नाही…

संजू परब: येत्या दोन-चार दिवसात आणखीन चार विद्यमान सरपंच शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार..

⚡सावंतवाडी ता ३०-: सावंतवाडी मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे आमदार केसरकर यांच्या माध्यमातून झालेली आहेत. त्यामुळे “मीच आणलं, मीच आणलं” म्हणणाऱ्यांनी काहीही आणलेले नाही, असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी विरोधकांना लगावला .तर येणाऱ्या सर्व निवडणुका आम्ही आमच्या प्रयत्नांवरच जिंकणार आहोत, असा ठाम विश्वास परब यांनी व्यक्त केला
ते सावंतवाडीत शिवसेनेतर्फे आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात बोलत होते.

ते पुढे म्हणाले, माझ्या पाठीशी शिवसेनेचे सर्व नेतेमंडळी ठामपणे उभी आहेत, त्यामुळे मला कोणाचीही भीती नाही. शिंदे साहेबांना जशी शिवसेना हवी आहे, तशीच शिवसेना आम्ही उभी करू. आगामी चार दिवसांत आणखी काही विद्यमान सरपंच पक्षप्रवेश करणार असल्याची माहितीही परब यांनी व्यासपीठावर दिली. तसेच, युती होवो अथवा न होवो, आमची लढाईची तयारी पूर्ण आहे आणि निश्चितच या मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page