देवानंद लुडबे यांची स्वखर्चाने रस्त्यावरील खड्ड्यांवर डागडुजी…

⚡मालवण ता.२१-:
तारकर्ली-देवबाग मालवण : रस्त्यावर मोठ्या प्रमाणात असलेले खड्डे व चर युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे यांनी स्वखचनि बुजविण्यास सुरुवात केली आहे. यावेळी, देवानंद लुडबे यांच्यासोबत जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष मेघनाद धुरी, जिल्हा सरचिटणीसं अरविंद मोंडकर, तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, श्रीकृष्ण तळवडेकर, वायरी उपसरपंच प्राची माणगावकर, गणेश पाडगावकर, पराग माणगावकर, सरदार ताजर, दिलीप तळगावकर, मेघःश्याम लुडबे, इतर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

 बुधवारी होणारा देव रामेश्वर नारायण पालखी सोहळा याच मार्गावरून होणार असल्यामुळे युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा वायरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच देवानंद लुडबे यांनी स्वखर्चाने खड्डे व चर बुजविण्यास सुरुवात केली.
You cannot copy content of this page