कोकण कला व शिक्षण विकास संस्थेकडून “सन्मान नारीचा, सन्मान नवदुर्गांचा” कार्यक्रम उत्साहात संपन्न…!

⚡बांदा ता.२९-:
ग्रामीण व डोंगराळ भागातील महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेकडून “सन्मान नारीचा, सन्मान नवदुर्गांचा” हा कार्यक्रम इन्सुली येथे मोठ्या उत्साहात पार पडला. पोलीस पाटील, डॉक्टर, वकील, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उद्योजिका व सावंतवाडीच्या माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी भूषवले. आपल्या भाषणात त्यांनी “इच्छाशक्ती व मेहनतीच्या जोरावर स्त्रिया यशाची शिखरे गाठू शकतात. महिलांच्या योगदानाचा गौरव करण्यामागचा हेतू म्हणजे त्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे व समाजात सकारात्मक बदल घडावा” असे प्रतिपादन केले.
कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल म्हणाले, “महिलांचा सन्मान करणे म्हणजे समाजाच्या प्रगतीचा सन्मान आहे. अशा उपक्रमांमुळे त्यांना अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळते.” या कार्यक्रमात आय.टी. क्षेत्रातील युवा उद्योजिका ऐश्वर्या कोरगावकर यांनी महिलांना व्यावसायिक संधींबाबत मार्गदर्शन केले. तसेच नरेश शेट्ये, गुरुनाथ पेडणेकर, अशोक सावंत, बांदा सरपंच प्रियांका नाईक आदी मान्यवरांनी मार्गदर्शनपर विचार मांडले.
दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. १६ गावांतील तब्बल ६७ महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. “आजचा सन्मान म्हणजे आमच्या प्रयत्नांना मिळालेली शाबासकीची थाप असून पुढे अजून जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली,” असे बांदा ग्रामपंचायत सदस्य रुपाली शिरसाट म्हणाल्या.
कार्यक्रमाला सरपंच प्रियांका नाईक, प्रांजल जाधव, नयना देसाई, रेश्मा सावंत, सामाजिक कार्यकर्ते नितीन राऊळ, प्रीती पांगे, साक्षी पोटे, योगिता निजामकर, सुरज कदम, निलेश खामकर, महेश धुरी, अशोक सावंत, विराज परब, पोलीस कॉन्स्टेबल बबिता गवस आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प व्यवस्थापक प्रथमेश सावंत यांनी केले, तर सूत्रसंचालन समीर शिर्के यांनी केले. संपूर्ण नियोजन अमोल गुरम, वैष्णवी म्हाडगुत, नेहा कांबळी, अवंती गवस, पद्माकर शेटकर, ऋचा पेडणेकर, रोशनी चारी, गौरी आडेलकर, केशव नाचोंणकर यांनी केले.
फोटो:-
इन्सुली येथे आयोजित कार्यक्रमात सन्मान करण्यात आलेल्या विविध क्षेत्रातील महिलांसोबत उपस्थित असलेले मान्यवर.

You cannot copy content of this page