⚡बांदा ता.२९-: समाजासाठी रक्तदान हे सर्वात मोठे दान असून, यामधून असंख्य जीव वाचवले जाऊ शकतात. या सामाजिक जाणिवेतून कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सक्षम कोकण फाऊंडेशन असनीये आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने असनीये येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबीराला दात्याचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, असनीये सरपंच रेश्मा सावंत, माजी उपसरपंच चंदन नाईक, प्रीती पांगे, सुरज कदम, निलेश खामकर, साक्षी पोटे, योगिता निजामकर, पोलीस पाटील भिकाजी सावंत, कृषी अधिकारी मिलिंद नाईक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी बोलताना दयानंद कुबल यांनी, “रक्तदानाने कुणाचातरी जीव वाचतो ही जाणीव समाजात रुजवणे आवश्यक आहे. युवकांनी पुढाकार घेतल्यास गावोगावी रक्तदान चळवळ उभारता येईल,” असे प्रतिपादन केले.
या शिबिरात चंदन नाईक, गौरेश सावंत, अर्जुन सावंत, नीलेश राणे, मिलिंद निकम, अर्जुन महाडेश्वर, हर्षद मयेकर, गंगाराम सातार्डेकर, कृष्णा सावंत, विनोद सावंत, सतीश सावंत, विनायक कोळपटे यांच्यासह अनेकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले.
मान्यवरांनी रक्तदात्यांचा विशेष सत्कार करून त्यांचा सामाजिक बांधिलकीबद्दल गौरव केला. या शिबिरात युवक-युवतींनी केलेल्या सहभागामुळे परिसरात समाजभान आणि सेवा भावनेचे वातावरण निर्माण झाले होते.
असनीये येथे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न…
