⚡बांदा ता.२९-: मुंबई-विलेपार्लेचे माजी आमदार तथा डेगवे हितवर्धक संघ मुंबईचे अध्यक्ष गुरुनाथ देसाई यांच्या पत्नी सौ. दर्शना गुरुनाथ देसाई (वय ६५) यांचे रविवारी रात्री निधन झाले. सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
डेगवे हितवर्धक संघ मुंबईचे सदस्य उल्हास देसाई यांनी सांगितले की, दर्शना देसाई यांचा डेगवे हितवर्धक संघ मुंबईच्या सदस्यांना आधार होता. त्या नेहमी हितवर्धक संघाच्या उपक्रमांना व कार्यक्रमांना पाठबळ देत असत. तसेच सदस्या देखील त्यांचे मार्गदर्शन लाभत असे. त्यांच्या निधनाने हितवर्धक संघाचे नुकसान झाले आहे.
फोटो:-
पासपोर्ट.
सौ. दर्शना देसाई यांचे निधन…!
