नाग्या महादू निवासी वसतिगृहातील मुलांना स्पोर्टस् योगाचे प्रशिक्षण…

⚡वेंगुर्ला ता.२९-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा वाढदिवस सेवा पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून डॉ.वसूधाज योगा अॅण्ड फिटनेस अकॅडमीतर्फे वेताळ बांबर्डे येथील नाग्या महादू निवासी वसतिगृहातील मुलांना स्पोर्टस् योगाचे प्रशिक्षण देण्यात आले.
हा प्रशिक्षण कार्यक्रम डॉ.वसूधाज योगा अॅण्ड फिटनेस अकॅडमी, आणि वेंगुर्ला भाजपा महिला आघाडीतर्फे घेण्यात आला. यात डॉ.वसुधा मोरे, रामा पोळजी, मनोह बेहरे, गौरव गंगावणे, वृंदा मोर्डेकर आणि मोना नाईक यांनी मुलांना प्रशिक्षण दिले. कोणत्याही शासकीय मदतीशिवाय मुलांचे पालन पोषण करणारे उदय अहिरे आणि उजा अहिरे यांचे अकॅडमीतर्फे खास कौतुक करून येथील मुलांना ऑलिपिक स्पर्धेसाठी सक्षम बनविण्यासाठी सहकार्य करण्याचे अभिवचन डॉ.वसुधा मोरे यांनी दिले.

You cannot copy content of this page