⚡मालवण ता.१२-:
क्रीडा व युवा संचलनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यातर्फे रेकोबा हायस्कूल, वायरी मालवण येथे आयोजित १९ वर्षाखालील मुलांच्या तालुकास्तरीय खो – खो क्रीडा प्रकारात स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने वराडकर हायस्कूल, कट्टा च्या संघाला नमवून विजेतेपद पटकाविले. हा संघ जिल्हास्तरावर मालवण तालुक्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
या संघात चिन्मय मेस्त, सिद्धेश करंगुटकर, देवेश गावकर, यश कोळंबकर, शुभम लुडबे, हरिश्चंद्र देऊलकर, मयुर बागवे, सुरज आळवे, तुषार आढाव, ओम मिठबावकर, सुयश कदम, जतीन करंगुटकर, राज लाड यांचा विद्यार्थ्यांचा समावेश होता. या संघाला सागर सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवराम ठाकूर, कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कृ.सी.देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. साईनाथ चव्हाण, सचिव श्री. चंद्रशेखर कुशे यांनी अभिनंदन केले.
