गणेशोत्सवात मालवण एसटी आगराला १२ लाख रुपयांचे उत्पन्न…

⚡मालवण ता.१२-:
मालवण तालुक्यात शहरी आणि ग्रामीण भागात ५३ एसटी बसेस चाकरमान्यांना घेऊन दाखल झाल्या होत्या. सर्व बसेस मालवण बसस्थानकाच्या नियंत्रणात टोपीवाला हायस्कूलच्या पटांगणावर ठेवण्यात आल्या होत्या. यावर्षी मोठ्या संख्येने चाकरमान्यांनी एसटीला पसंती दिली होती.

  एसटीकडून सुरक्षित प्रवास करण्यात आला होता. नियोजित वेळेत एसटी गाड्या सुटत असल्याने चाकरमानी प्रवासी वर्गाकडून एसटीला पसंती देण्यात आली.

मालवण एसटी आगाराकडून यावर्षी गौरी गणपती २०२५ साठी ५३ बसेस वापरून मुंबई, ठाणे, बोरिवली, भाईंदर, विरार येथून कोकणातील प्रवासी गावागावात आणण्यात आले होते. १ ते ७ सप्टेंबरपर्यंत परतीची वाहतूक करण्यात आली. या वाहतुकीमुळे महामंडळास १२ लाख २ हजार ६२६ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती मालवण आगार व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी यांनी दिली

You cannot copy content of this page