⚡मालवण ता.१२-:
क्रीडा व युवा संचालनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आयोजित ९ सप्टेंबर रोजी उपरकर शूटिंग रेंज, वेंगुर्ले येथे झालेल्या १९ वर्षांखालील मुले रायफल शूटिंग स्पर्धेत पिप साईट या क्रीडा प्रकारात येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी कला शाखेतील विद्यार्थी निशांत नितीन शिरोडकर याने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. १९ ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा संकुल, ओरोस येथे झालेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत ७९ किलो वजनी गटातही त्याने प्रथम क्रमांक पटकावला असून दोन्ही क्रीडा प्रकारांत त्याची विभागस्तरावर निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थ्याचे महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य डॉ. शिवराम ठाकुर, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे यांनी कौतुक केले. त्याला क्रीडा मार्गदर्शक प्रा. हसन खान यांचे मार्गदर्शन लाभले.
