⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी शहरातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी आज गणेश चतुर्थी निमित्त विशाल परब यांनी भेट देऊन गणेश मूर्तीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पदाधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या सुखदुःखाची विचारपूस केली व सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी परब यांचं देखील मोठ्या उत्साहात कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
विशाल परब यांनी शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरी घेतले गणरायाचे दर्शन…
