जिल्हास्तरीय टेबलटेनिस स्पर्धेत जय गणेश इंग्लिश स्कूलचे सुयश…

⚡मालवण ता.२१-:
मालवण एज्युकेशन सोसायटीच्या जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल च्या सुलोचना पाटील मेमोरियल हॉल मध्ये घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या १४ वर्ष मुले व १७ वर्ष मुलींच्या संघाने विजेतेपद पटकाविले. हे दोन्ही संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

जय गणेश इंग्लिश स्कुलच्या या सर्व खेळाडूना क्रीडा प्रशिक्षक विष्णू कोरगावकर, चंदू साळवी, निशिकांत पराडकर, पंकज राणे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मालवण एज्युकेशन सोसायटी, मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मुलांचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.

You cannot copy content of this page