⚡मालवण ता.२१-:
मालवण तालुका मत्स्य उत्पादक शेतकरी सहकारी संस्था मर्या. मालवण या संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये संस्थेच्या अध्यक्ष पदी हरिश्चंद्र उर्फ हरी मोहन खोबरेकर तर उपाध्यक्ष पदी मिथुन दामोदर मालंडकर हे निवडून आले.
मालवण तालुका मत्स्य उत्पादक शेतकरी सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदासाठी हरी खोबरेकर यांच्या विरोधात शंकर रमेश वाघ तर उपाध्यक्ष पदासाठी मिथुन मालंडकर व प्रमिला प्रदीप मोर्जे हे उमेदवार होते. या निवडणूक प्रक्रियेमध्ये हरी खोबरेकर (विजयी) यांना ८ मते तर शंकर वाघ (पराभूत) यांना ३ मते मिळाली. तर उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मिथुन मालंडकर (विजयी) यांना ८ मते तर प्रमिला मोर्जे (पराभूत) यांना ३ मते पडली.
निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी अजय हिर्लेकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अतुल मालंडकर, शिवप्रसाद चौकेकर यांनी काम पाहिले. यावेळी बाबी जोगी, चंद्रशेखर उपरकर, नरेश हुले, सेजल परब, संमेश परब, भाऊ मोर्जे, जयदेव लोणे, रश्मीन रोगे यांनी निवडून आलेल्या दोन्ही उमेदवारांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी हरी खोबरेकर यांनी हा विजय मच्छीमारांसाठी केलेल्या कार्याचा व मच्छीमार एकजुटीचा असल्याचे त्यांनी सांगितले.
