⚡मालवण ता.२१-:
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने जय गणेश इंग्लिश मेडीयम स्कूल मालवण येथे दिनांक २१ ऑगष्ट रोजी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत टोपीवाला हाय स्कूल मालवण प्रशालेच्या १४ वर्षाखालील मुलींच्या संघाने विजेते पद मिळवले हा विजयी संघ कोल्हापूर विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे
या संघात कु वीरा वारंग, कु धनश्री परब, कु राही जाधव कु ईश्वरी शिंदे यांनी नेत्रदिपक कामगिरी करून विजेते पद पटकाविले या संघास प्रशिक्षक विष्णू कोरगांवकर सर, चंदू साळवी यांचे मार्गदर्शन मिळाले विजयी संघाचे क्रीडा शिक्षक श्याम वारंग रेनॉल्ड भूतेलो मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू सर संस्था पदाधिकारी विजय कामत ,दिगंबर सामंत, पर्यवेक्षक देविदास वेरलकर ,चंदशेखर बर्वे
एस बी वाकुडे यांनी अभिनंदन करून पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत
