⚡बांदा ता.२१-: इन्सुली सहकारी दुग्ध व्यवसायिक संस्थेच्या वतीने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना गणेश चतुर्थी निमित्त भेटवस्तू वाटप कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त अभियंता तसेच वामनराव पै यांचे शिष्य शिवाजी पालव इन्सुली विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन साबाजी परब संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर यांच्या उपस्थित संस्था कार्यालयात कार्यक्रम पार पडला.
यावेळी श्री पालव म्हणाले, संस्थेचा दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना गणेश चतुर्थी भेटवस्तू देण्याचा हा कार्यक्रम कौतुकास्पद आहे. सहकारातून उन्नती साधण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आज शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध उत्पादन हा व्यवसाय शेतकऱ्यांनी निवडावा.
प्रास्ताविकामध्ये संस्था अध्यक्ष श्री पेडणेकर यांनी गेली अकरा वर्ष गोकुळच्या माध्यमातून दुग्ध संकलन केले जाते. इन्सुलीतील शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून जवळजवळ 160 शेतकरी या संकल्पनाचा फायदा घेत आहेत. शासनाच्या विविध योजनांचा फायदा शेतकऱ्यांनी घेऊन आपलं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आज संस्था साडेसहाशे लिटर दूध संकलन करते.
यावेळी कार्यक्रमाला संस्था सचिव संजय सावंत, उपाध्यक्ष सहदेव सावंत, खजिनदार सखाराम बागवे, संचालक सौ. गीतांजली हळदणकर, विलास गावडे, सुधीर गावडे तसेच दुग्ध उत्पादक प्रसाद सावंत, मंगेश चराटकर, बाबाजी देसाई, दिलीप नाईक, संतोष परब, नारायण राणे, सिताराम गावडे, राजन धुरी, वासुदेव हळदळकर, गौरव हळदणकर, प्रदीप राणे, प्रदिप कोठावळे, सौ. प्रगती गावडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुनाथ पेडणेकर यांनी केले तर आभार संजय सावंत यांनी मानले.
फोटो:-
इन्सुली येथे शेतकऱ्यांना भेटवस्तू वाटप करताना शिवाजी पालव, गुरुनाथ पेडणेकर, साबाजी परब, संजय सावंत व इतर.
