*आंबोली “त्या” रस्त्याच्या गैरव्यवहारात आमदार गप्प का…?

भाजप पदाधिकारी संतोष पालेकर याचा सवाल; आमदार नितेश राणे कडे करणार चौकशीची मागणी*

*💫आंबोली, दि.०५-:* आंबोली फौजदार वाडी येथील मुख्यमंत्री सडक योजनेतून दीड कोटीच्या कामात जो गैव्यवहार होत आहे त्यात आमदार गप्प का? त्यांचेच लोकप्रतिनिधी ठेकेदाराची पाठराखण करीत असून त्यांनीच रस्ता आणि पुलाचे काम सुरू असताना महिनाभर समोर उभे राहून काम झाल्याने भ्रष्टाचार हा संगनमताने झाला आहे. शासनाच्या पैशात अशी लुटमार होत असेल तर या प्रकरणी कारवाई झालीच पाहिजे यासाठी आमदार नितेश राणे यांच्याकडे मागणी करणार असल्याचे भाजप पदाधिकारी संतोष पालेकर यांनी सांगितले आहे. श्री. पालेकर यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे,आंबोली फौजदार वाडी येथे मुख्यमंत्री सडक योजनेतून एकदम थर्ड क्लास बोगस काम होत आहे.६ महिने पुलाचे धीम्या गतीने काम सुरू आहे. मोरिचे काम बोगस असून हाताने कोसळत आहे.नवीन रस्ता काम हे बोगस आहे. हे काम तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी समोर राहून होत होते.त्यामुळे ठेकेदाराची पाठराखण हा लोकप्रतिनिधी करत असून संगनमताने यात भ्रष्टाचार झाला आहे. आमदार केसरकर यांच्याकडे लोकांनी या कामाची मागणी केली त्यानुसार त्यांनी मंजूर केला.मात्र ठेकेदार आणि त्यांचेच पदाधिकारी मिळून येथे बोगस काम होते आहे.त्या कामाचा दर्जा नसून लुटमार आहे.मग आमदार या प्रकरणी गप्प का? ठेकेदाराची पाठराखण करण्यात त्या पदाधिकारी सोबत त्यांचा पाठिंबा आहे काय ते त्यांनी जाहीर करावे. या कामाची चौकशी उच्च स्तरीय होवून असल्या बोगस ठेकेदारांकडून तत्काळ काम काढून घेवून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी आमदार नितेश राणे यांच्याकडे करणार आहे असे पालेकर म्हणाले,तसेच ५ वर्षांपूर्वी भ्रष्टाचाराचे बेछूट आरोप करणारा लोकप्रतिनिधी प्रत्यक्षात किती प्रामाणिक पणे काम करत आहे हे लोकांनी ओळखले आहे.जनतेची किती कामे होत आहेत तेही दिसत आहे. ५ वर्षांपूर्वी रुग्ण कल्याण समितीच्या नावाने बोंब मारणारे आता कोणते दिवे लावले आहेत.काम होण्याआधी ठेकेदार पैसे खर्च घालून गैर वेवहार करत आहे.तो ठेकेदार कोणाच्या मर्जीने करत आहे.रुग्ण वाहिका धुण्यासाठी पाण्याची तसेच त्यांची सोय करण्याची जबाबदारी कोणाची? रिक्त पदांबाबत एकदाही जिल्हापरिषद मध्ये आवाज काढला नाही. ५वर्षे शिवसेनेची सत्ता असताना ठराविक मोजक्या लोकांची मोनोफोली होती बाकी जनतेची किती कामे झाली? त्यामुळे यावेळी लोकांनी जागा दाखवली असे संतोष पालेकर म्हटले आहे.

You cannot copy content of this page