बीडीओ, अधिकारी सभापतींना ऐकत नाहीत…

त्यामुळे वित्त आयोग, रोजगार हमीची कामे ठप्प;प स सभेत सुनील घाडीगांवकर यांचा आरोप

मालवण दि प्रतिनिधी मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांसह प्रशासन हे सभापती अजिंक्य पाताडे यांना जुमानत नसल्याने १५ वा वित्तआयोग, एमआरजीएस च्या माध्यमातून होणारी तालुक्याची कामे ठप्प झाल्याचा घणाघाती आरोप करीत मालवणचे माजी सभापती तथा पंचायत समितीचे विद्यमान गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी सभापतींचा अंकुश नसल्याने ही स्थिती निर्माण झाल्याची जहरी टीका केल्याने गटनेते घाडीगांवकर यांचा सभापतींना घरचा आहेर दिल्यात जमा आहे दरम्यान सभापती पाताडे यांनी सर्व सदस्यांची एकत्रित बैठक घेऊन याबाबत तोडगा काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा. असेही घाडीगांवकर यांनी सूचित केले. मालवण पंचायत समितीची ऑनलाईन मासिक सभा सभापती अजिंक्य पाताडे यांच्या अध्यक्षते खाली पार पडली. या सभेस उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, गटनेते सुनील घाडीगांवकर, सदस्य कमलाकर गावडे, अशोक बागवे, विनोद आळवे, सोनाली कोदे, मधुरा चोपडेकर, गायत्री ठाकूर, मनीषा वराडकर, निधी मुणगेकर, सागरिका लाड यांसह अधिकारी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. यावेळी सुनील घाडीगांवकर यांनी तालुक्यातील एमआरजीएस अंतर्गत होणारी कामे बंद का आहेत असा सवाल उपस्थित केला. यावर प्रशासनाकडून कोरोना खबरदारी पार्श्वभूमीवर काम बंद ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र सर्व शासकीय कामे सुरू असताना एमआरजीएस कामे बंद का ? तसा शासन आदेश असेल तर द्या अन्यथा कामे सुरू करा अशी भूमिका घाडीगांवकर यांनी मांडत प्रशासन सभापतींचे ऐकत नसल्याने १५ वा वित्तआयोग, एमआरजीएस च्या माध्यमातून होणारी कामे ठप्प झाली आहेत, सभापतींचा प्रशासनावर अंकुश नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे, असे आरोप घाडीगांवकर यांनी केला. याप्रश्नी सभापती यांनी सर्व सदस्यांची एकत्रित बैठक घेऊन याबाबत तोडगा काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा, असेही घाडीगांवकर यांनी सूचित केले. एमआरजीएसच्या कामांना आपण कधीही आडकाठी केलेली नाही असे गटविकास अधिकारी जाधव यांनी सांगितले. तर एमआरजीएस च्या कामांमध्ये मालवण तालुका एक नंबर ला असून ही कामे होण्याबाबत मार्ग काढू असे सभापती पाताडे यांनी सांगितले. पाचवी ते आठवी वर्गातील मुलांना शासनाकडून मिळणारी शाळा पुस्तके शिक्षकांना जमा करून घेण्याचे आदेश देण्यात आले अशी माहिती मिळाली आहे. मात्र कोरोना वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सर्वकाही ठप्प झाले असताना आताच पुस्तके जमा करणे योग्य नाही. शाळा सुरू झाली की विध्यार्थी वर्गाकडून पुस्तके जमा करावीत असे सुनील घाडीगांवकर यांनी सूचित केले. तालुक्यातील अन्य विविध प्रश्नांवर सदस्यांनी चर्चा केली. अशी माहिती गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी माहिती देताना सांगितले आहे. एकीकडे लसचा तुटवडा असताना प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या लसचा लाभ केवळ प्राथमिक आरोग्य केंद्र असणाऱ्या गावसह नजीकच्या गावांतील नागरिकांनाच होत आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेतील लांब अंतरावर असणाऱ्या गावातील लोकांना लस घेणे अवघड होतं असून अशा गावांतील आरोग्य उपकेंद्रात लस उपलब्ध करावी, प्रत्येक उपकेंद्र निहाय लसचे १०० डोस उपलब्ध करावेत अशी मागणी राजू परुळेकर यांनी यावेळी केली. लस ज्याप्रमाणे उपलब्ध होतील त्याप्रमाणे गावागावातील आरोग्य उपकेंद्रात अथवा ग्रामपंचायतीत लसीकरण करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे यावेळी गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव व आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी यांनी सांगितले. यावेळी सोनाली कोदे व मधुरा चोपडेकर यांनी गावागावात मिळणाऱ्या कोरोना रुग्णांबाबत, कंटेन्मेंट झोन बाबत आरोग्य विभागाकडून पंचायत समिती सदस्यांना कोणतीच माहिती देण्यात येत नाही. यामुळे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नात अडचणी येत आहेत. लोकप्रतिनिधींना आपल्याच गावातील माहिती दुसऱ्यांकडून घ्यावी लागते असे सांगत कोरोना रुग्ण बाबत पं. स. सदस्यांना माहिती देण्यात यावी अशी मागणी केली. याबाबत आरोग्य अधिकारी डॉ. मिठारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आरोग्य विभाग व पं. स. सदस्य यांची बैठक घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले. भूजल सर्व्हे तसेच बोअरवेलची कामे पावसाळ्यापूर्वी करून घेण्यात यावीत अशा सूचना यावेळी सुनील घाडीगांवकर यांनी मांडल्या. रेवंडी गावातील रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर डंपर वाहतूक होत असल्याने रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळे खनिकर्म विभागाने खनिकर्म निधीतून या रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी अशी सूचना यावेळी सोनाली कोदे यांनी मांडली. महाराष्ट्र दर्शन या शासन योजनेतून पंचायत समिती कर्मचारी यांनी प्रवास घडवला. त्याबाबत रीतसर बिले प्रशासनाकडे सादर करण्यात आली मात्र त्याची देयके प्रशासनाने दिली नाहीत. प्रत्यक्ष जागेवरचे फोटो सादर न झाल्याने अथवा अन्य क

You cannot copy content of this page