देवबागचे सुपुत्र काशिनाथ राऊळ यांची राष्ट्रपती पदकसाठी निवड…

श्री. राऊळ मुंबई पोलीस मध्ये उपनिरीक्षक पदी कार्यरत:देवबाग गाबीत समाजाने केले अभिनंदन..

कुडाळ : देवबाग गावचे सुपुत्र तथा सध्या नवी मुंबई महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे येथे कार्यरत असलेले पोलीस उप निरीक्षक काशिनाथ दत्ता राऊळ ह्यांची गुणवत्तापूर्ण सेवेकरीता राष्ट्रपती पदक साठी निवड करण्यात आली आहे. काशिनाथ राऊळ यांचे हे यश गाबीत समाजासाठी यासाठी अभिमानास्पद असल्याचे म्हटले असून श्री. राऊळ त्यांचे जाहीर अभिनंदन केले आहे.
भारताचे मा. राष्ट्रपती यांच्याकडून स्वातंत्र्यदिनी १) शौर्य पदक (GM) २) मा. राष्ट्रपती यांचे उल्लेखनीय सेवेचे पदक (PSM) आणि ३) गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक (MSM) ही पदके व्यक्ती तसेच अधिकारी/कर्मचारी यांना उल्लेखनीय कामगिरी करीता दिली जातात. महाराष्ट्र पोलीस दलातील ३९ अधिकारी/कर्मचारी यांची गुणवत्तापूर्ण सेवेच्या पदकासाठी मा. राष्ट्रपती यांचेकडुन निवड करण्यात आली असुन यामध्ये महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे, नवी मुंबई येथील नेमणुकीतील पोलीस उप निरीक्षक काशिनाथ दत्ता राऊळ यांची निवड करण्यात आली आहे.
या पदकासाठी निवड झाल्याने काशीराम राऊळ यांचे अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य यांनी त्यांचे अभिनंदन केले असुन पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, रायगड परिक्षेत्र तानाजी चिखले यांनी महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे, नवी मुंबई येथे स्वातंत्र्य दिनी त्यांचा सत्कार करून अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे, नवी मुंबईचे प्रभारी अधिकारी वैभव रोंगे, पोलीस उपनिरीक्षक संजय टिळेकर तसेच सर्व पोलीस अंमलदार हे उपस्थित होते.
पोलीस उप निरीक्षक काशिनाथ दत्ता राऊळ हे 1988 साली पोलीस दलामध्ये भरती झाले असुन त्यांनी 37 वर्षाच्या सेवाकाळामध्ये राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड पुणे, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय तसेच महामार्ग पोलीस पथक येथे कर्तव्य बजावले आहे. दि. ३१/१०/२०२५ रोजी ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणार असुन त्या अगोदर मा. राष्ट्रपती यांचे गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक (MSM) साठी त्यांची निवड झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. यापूर्वी त्यांना दिनांक 01-05-2017 रोजी महासंचालक पोलीस पदक ( DG Medal) देवून गौरविण्यात आले आहे.

You cannot copy content of this page