वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल १५ वर्षे वयोगट मुले व मुली चॅम्पियनशिप चाचणी..
कुडाळ : दिनांक 11 व 12 ऑगस्ट 2025 रोजी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज जिल्हा क्रीडा संकुल सातारा येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय निवड चाचणीत कोल्हापुर विभागातून एस एल देसाई विद्यालय पाटच्या खेळाडूची निवड झाली .
आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघाद्वारा वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल 15 वर्षे मुले व मुली चॅम्पियनशिप दिनांक 4 ते 13 डिसेंबर 2025 या कालावधीत चीन देशामध्ये आयोजित होणार आहे. सदर स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार असून भारतीय संघाची निवड करण्यासाठी भारतीय शालेय महासंघाने राष्ट्रीय निवड चाचणी आयोजन दिनांक 19 ते 20 ऑगस्ट 2025 या कालावधीत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे बालेवाडी पुणे या ठिकाणी होणार आहे. या निवड चाचणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एस्. एल्. देसाई विद्यालय पाट विद्यालयातील खेळाडू कुमार सुयश सूर्यकांत पाटकर या खेळाडूची निवड करण्यात आली आहे. या खेळाडूस प्रशालेचे मुख्याध्यापक राजन हंजनकर, क्रीडा शिक्षक- संजय पवार , दत्तात्रय कुबल व राष्ट्रीय खेळाडू रुपेश कोनकर , चारुहास वेंगुर्लेकर , अमित हर्डीकर यांचे मार्गदर्शन लाभले .
संस्था अध्यक्ष दिगंबर सामंत, संस्था कार्याध्यक्ष देवदत्त साळगांवकर,सचिव विजय ठाकूर व सर्व संस्था पदाधिकारी व प्रशालेचे मुख्याध्यापक राजन हंजनकर,पर्यवेक्षक सयाजी बोंदर यांच्यासह प्रशालेतील सर्व कर्मचारी वर्ग व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सुयशचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
