पक्ष जी मला जबाबदारी देईल ती जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडणार…

विशाल परब:मला पक्षामध्ये घेण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचा मी आभार मानतो..

⚡सावंतवाडी ता.१९-: मी कधीच भाजपा सोडली नव्हती मी त्यावेळी आणि आजही भाजपच होतो. मात्र आज खऱ्या अर्थाने मी भाजपमय झाल्याने मला अतिशय आनंद होत आहे. आज भारतीय जनता पार्टी हा पक्ष देशात आणि राज्यात एक नंबरचा पक्ष आहे त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष जी मला जबाबदारी देईल ती जबाबदारी मी पूर्णपणे पार पडणार आहे. अशी प्रतिक्रिया भाजप युवा नेते विशाल परब यांनी भाजपमध्ये घरवापसी केल्यानंतर पत्रकारांची बोलताना दिली.

श्री परब पुढे बोलताना म्हणाले माझ्यासोबत जी मंडळी होती आणि मला विधानसभा मतदारसंघातील जनतेने जी मते पदरात टाकली ती सर्व भारतीय जनता पार्टीची आहेत. माझ्या पडत्या काळात जे माझ्यासोबत राहिले त्या सर्व कार्यकर्त्यांचा आम्ही ऋणी आहे तसेच मला पक्षामध्ये घेण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो येणाऱ्या काळात कोकणामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत तसेच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी माझे प्रयत्न असतील असे देखील त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

You cannot copy content of this page