*माझे कुटुंब,माझी जबाबदारी योजना राबवण्यासाठी पथक तैनात करणार…

*पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती*

💫 *सिंधुदुर्गनगरी*:- होम आयसोलेशन मधल्या पॉझिटिव्ह पेशंटच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर तर बाहेरून आलेल्या व्यक्तीच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर मार्किंग करावे यासाठी शाईचा तुटवडा असल्याने पोलिओ डोसच्या वेळी वापरण्यात येणारा पेन वापरावा तसेच हे लोक बाहेर फिरताना दिसल्यास पोलीस ,तहसीलदर यांच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार असून *‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’* ही योजना राबविण्यासाठी पथक तैनात करण्यात येणार असून आठवडा बाजार चालू असेल तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या सुचना पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी यांना दिल्या . तसेच विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणाऱ्या फी बाबत एफआरए कमिटीसोबात पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page