पाडलोस ग्रा.पं.सदस्य लीना माधव यांचा राजीनामा…

*💫बांदा दि.०३-:* काही दिवसांपूर्वी आपल्या संपूर्ण कुटुंबाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. पाडलोस ग्रामपंचायतकडून माझ्या कुटूंबाला सामाजिक आणि मानसिक स्तरावर मदत होणे अपेक्षित होते. परंतु कुठल्याही प्रकारची मदत झाली नाही. स्वतः ग्रामपंचायत सदस्य असूनसुद्धा माझी कोणीही दखल न घेतल्यामुळे सामान्य नागरिकांना आम्ही तरी काय मदत करणार असा प्रश्न मला वारंवार सतावत आहे. त्यामुळे व्यथित होऊन मी माझ्या ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा पाडलोस सरपंच अक्षरा पाडलोसकर यांच्याकडे दिल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. लीना माधव म्हणाल्या की, कोरोना बाधित रुग्ण योग्य उपचारानंतर व्यवस्थित पूर्णपणे बरा होतो. आम्ही आरोग्य विभागाच्या नियमांचे क्वारंटाइन कालावधीत काटेकोरपणे पालन केले. आज आम्ही कोरोना मुक्त झालो असलो तरी देखील समाज आमच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत आहे. कोरोना काळात आमच्या कुटुंबाचे जीवनावश्यक वस्तूंसाठी खूप हाल झालेत. जनावरांसह दैनंदिन जीवनात वापरासाठी पुरेसे पाणी देखिल मिळणे कठीण झाल्याचा अनुभव आम्हाला आला. त्यामुळे गावात कोणत्याही व्यक्तीस कोरोना झाल्यास आणि त्याला जीवनावश्यक वस्तूंची गरज भासल्यास आपल्या परीने सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सौ. माधव यांनी सांगितले.

You cannot copy content of this page