सेनेच्या ४० कार्यकर्त्यांना प्रवेश मात्र दोन पत्रकाराना प्रवेश नाही;दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय पालकमंत्री पाहणी दौऱ्यावर भाजपच्या प्रवीण गवस यांची टिका
*💫दोडामार्ग दि.३-:* जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात अनेक समस्या सोडविण्यासाठी आपला वेळ देऊन पाहणी केली मात्र सदर पाहणी आढावा दरम्यान तालुक्यातील पत्रकार यांना त्याचे दोन प्रतिनिधी यांना मज्जाव करण्यात आला त्यामुळे पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली या कार्यक्रमात शिवसेना पक्षाच्या 30 ते 40 कार्यकत्यासाठी प्रवेश देण्यात आला यामुळे तालुक्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना आजचा प्रकार म्हणजेच लोकशाही मार्गाने पत्रकार लढत असताना त्याना डावलून पाहणी करण्यासाठी आलेल्या पालकमंत्री यांनी दोडामार्ग तालुक्यातील जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले असा आरोप भाजपा दोडामार्ग तालुका अध्यक्ष प्रवीण गवस यांनी केला आहे दोडामार्ग ते बांदा रस्ता तसेच विजघर ते दोडामार्ग रस्ता दोडामार्ग ते आयी रस्ता आदी कामे मंजूर केली म्हणून सांगून घोषणा करूनही प्रत्यक्षात कामाला सुरुवात नाही ऐका वर्षात ग्रामीण रुग्णालय सुसज्ज करण्यात येईल अशी घोषणा ही हवेत जिरली आहे त्यामुळे आजची पाहणी म्हणजे निव्वळ फसवणूक केली असून तालुक्याला काहीच दिले नसल्याने पालकमंत्री खासदार आमदार यांनी कार्यकत्याना भेट की कोरोना वाढी साठी असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे असे प्रवीण गवस यांनी म्हटले आहे
