गतवर्षी पुरात प्रवाहात आलेले दगड, गोटे तातडीने साफ करा…

राष्ट्रवादी नेते सुरेश दळवींची तिलारी कार्यकारी अभियंताकडे मागणी;नुकसानी मदत मिळाली नसल्याचीही केली टिका

*💫दोडामार्ग दि.०३-:* तिलारी धरणातील जलाशयात अचानक पणे गेल्यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळल्याने पाणी साठा वाढल्याने नदीलगत गावात पुरस्थिती निर्माण झाली होती अनेकांची तारांबळ उडाली होती जीवितहानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानी झाली त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही त्यामुळे गतवर्षी नदी पात्रातील गाळ व दगडगोटे काढून साप सफाई तातडीने करून प्रवाह सरळ नदी पात्रात सोडावा व वायगणतड वासियाची मागणी पूर्ण करावी अशी मागणी तिलारी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्री आजगेकर यांच्या कडे राष्ट्रवादीचे नेते सुरेश दळवी यांनी केली आहे तिलारी धरणलगत असलेल्या सर्व गावातील कॉजवे साप सफाई केल्याने प्रवाह सरळ नदीपात्रात येणार आहे त्यामुळे वारंवार रस्त्यावर येणारे पाणी व होणारी वाहतूक विस्कळीत होणार नाही घोटगे परमे घोटगेवाडी कोनाळ आदी ठिकाणी ग्रामस्थांना अनेक समस्या भेडसावत आहे त्या ठिकाणी लक्ष देण्याची मागणी ही दळवी यांनी केली घोटगेवाडी कॉजवेच्या खाली नदी पात्र वायगंणतड गावाच्या दिशेने सरकल्याने नदी पात्र खुले करून पाण्याचा प्रवाह मशीनरीच्या सहाय्याने सरळ करावे यासाठी तातडीने यंत्रणा राबविली जाईल अशी ग्वाही श्री आजगेकर यांनी श्री दळवी व वायगणतड ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिली

You cannot copy content of this page