⚡बांदा ता.२६-: बांदा नट वाचनालयाचे माजी उपाध्यक्ष (कै.) सुभाष मोर्ये यांच्या स्मरणार्थ मोर्ये कुटुंबियांनी वाचनालयाला ५० हजार रुपये कायम ठेव रक्कम देणगी स्वरूपात दिली. या रकमेच्या वार्षिक व्याजातून दरवर्षी पावसाळी काव्य वाचन स्पर्धा घेण्याचा निर्णय वाचनालयच्या संचालक मंडळाने घेतला आहे.
यावेळी त्यांचा मुलगा आशिष मोर्ये, मुली अर्चना मोर्ये, अस्मिता मोर्ये, सौ. नीलम मोर्ये, आशय मोर्ये, नील मोर्ये आदी कुटुंबीय उपस्थित होते. श्रीमती सुगंधा मोर्ये यांनी (कै.) मोर्ये यांच्या स्मरणार्थ वाचनालयाला दरवर्षी एखादा उपक्रम घेण्याची विनंती केली होती.
यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष नीलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक सुधीर साटेलकर, जगन्नाथ सातोसकर, शंकर नार्वेकर, अंकुश माजगावकर, प्रवीण परब, ग्रंथपाल सुस्मिता नाईक, सहाय्यक ग्रंथपाल सुनील नातू आदी उपस्थित होते.
यावेळी आशिष मोर्ये यांनी नट वाचनालयच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. वाचन संस्कृती टिकविण्यासाठी वाचनालय करत असलेल्या प्रयत्नांना भविष्यात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी हेमंत मोर्ये यांनी मामोगत व्यक्त केले. देणगीसाठी राकेश केसरकर यांनी मोर्ये कुटुंबियांचे आभार व्यक्त केलेत.
फोटो:-
बांदा नट वाचनालयाला देणगी सुपूर्द करताना मोर्ये कुटुंबीय.
सुभाष मोर्ये यांच्या स्मरणार्थ मोर्ये कुटुंबियांनी वाचनालयाला ५० हजारची मदत…
