सन १९९२-९३ बॅचतर्फे मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव शाळेस आर्थिक मदत…

१ लाख २८ हजार ८५२ रुपयांचा धनादेश माजी विद्यार्थी परिवाराकडे सुपूर्द..

सावंतवाडी : मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी शाळेच्या सन १९९२-९३ च्या इयत्ता १० वी बॅचतर्फे मदतीचा हात देण्यात आला. या बॅचने जमा केलेल्या १ लाख २८ हजार ८५२ रुपयांचा धनादेश माजी विद्यार्थी परिवाराकडे सुपूर्द करण्यात आला.
ज्या शाळेने आपणाला घडवले, ज्या शाळेत आपण इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेतले, जीवनाचा पाढा ज्या शाळेने शिकवला, त्या शाळेप्रती आपण काहीतरी देणे लागतो, या एकमेव उद्देशाने शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी माजी विद्यार्थी परिवाराने केलेल्या आवाहनाला साथ देत १९९२-९३ बॅचच्यावतीने शाळेसाठी ही मदत करण्यात आली. या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी जमा केलेला रुपये १ लाख २८ हजार ८५२ रक्कमेचा धनादेश माजी विद्यार्थी परिवाराकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी १९९२-९३ चे विद्यार्थी गजानन राऊळ, दयानंद परब, पांडुरंग उर्फ बाप्पा नाटेकर, राजन तुळसकर, अरुण भाईडकर, गणेश गाड, शरद जाधव, नंदकिशोर दळवी, शकुंतला राऊळ, सतीश राऊळ, पांडुरंग बुगडे, प्रिया नार्वेकर, संतोष गावकर, विजय गावकर आदी माजी विद्यार्थ्यांसह माजी विद्यार्थी परिवाराचे शेखर पाडगावकर, हरिश नार्वेकर, मुख्याध्यापक मारुती फाले, पर्यवेक्षक सुनील कदम, शाळा व्यवस्थापान समिती अध्यक्ष मनोहर राऊळ आदी उपस्थित होते. शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी ही मदत केल्याबद्दल माजी विद्यार्थी परिवारातर्फे व शाळेच्यावतीने या बॅचचे आभार व्यक्त करण्यात आले. बॅचने केलेल्या या दातृत्वाचे मळगाव तसेच परिसरातून कौतुक होत आहे. बाकीच्या बॅचने या बॅचचा आदर्श घेत शाळेसाठी मदत करावी, असे आवाहन माजी विद्यार्थी परिवारातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page