बांदा/प्रतिनिधी
हिंदुत्वचे धगधगते अग्निकुंड गुरुवर्य सांभाजीराव भिडे गुरुजी हे जाहीर व्याख्यानाच्या निमित्ताने रविवार दिनांक १८ रोजी बांदा शहरात येत आहेत. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व हिंदू एकता मंच बांदा यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात सायंकाळी ५ वाजता येथील आनंदी मंगल कार्यालयात गुरुजींचे जाहीर व्याख्यान होणार आहे.
भिडे गुरुजी यांचा दौरा पुढीलप्रमाणे. रविवारी सायंकाळी ४ वाजता गवळीटेंब येथे गुरु कल्याणकर यांचे घरी चहापानाकरिता राखीव. तेथून निमजगा येथील जि.प. शाळा रस्ता मार्गे हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाजवळ नमन व पूजन.
तेथून हॉस्पिटल कट्टा, जि.प. शाळा नंबर १ मार्गे बांदेश्वर मंदिर येथे दर्शन. तेथून जुन्या ग्रामपंचायत समोरून गांधीचौक मार्गे आनंदी मंगल कार्यालय, कट्टा कॉर्नर येथे सभेकरीता उपस्थिती. औक्षण व व्याख्यान.
या कार्यक्रमात गुरुजींच्या हस्ते गोरक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे. नवीन उड्डाणपूलाखाली नामकरण करण्यात आलेल्या “श्रीराम चौक” फलकाचे अनावरण करण्यात येणार आहे. सभा संपल्यानंतर डोंगरआळी येथील निलेश सावंत यांच्या घरी जेवणाकरिता राखीव त्यानंतर सांगली येथे प्रस्थान करणार आहेत.
गुरुजींच्या धगधगत्या, तेजस्वी, ओजस्वी वाणीतुन देव, देश, धर्म समजुन घेण्यासाठी सर्व हिंदू बांधवांनी आपले धर्म कर्तव्य समजुन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हिंदू एकता मंचकडून करण्यात आले आहे.
फोटो:-
संभाजी भिडे गुरुजी.
गुरुवर्य सांभाजीराव भिडे गुरुजी हे जाहीर व्याख्यानाच्या निमित्ताने रविवारी बांद्यात…
