⚡बांदा ता.१६-:
बांदा शहराला आज दुपारी मुसळधार मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. तब्बल दीड तास पाऊस कोसळला. अचानक सुरु झालेल्या पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली. बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना पावसाचा फटका बसला. गटार साफसफाईची कामे झाली नसल्याने ठिकठिकाणी गटारे तुंबून पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. आज सकाळपासून शहरात वातावरण ढगाळ होते. मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
बांदा शहराला आज दुपारी मुसळधार मान्सूनपूर्व पावसाने झोडपले…
