मालवण दि प्रतिनिधी :
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत पहिली ते बारावीतील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ऑटोमेटेड परमानेंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री (अपार आयडी) तयार केली जात आहे. यात राज्य स्तरावर सिंधुदुर्ग जिल्हा अग्रेसर राहिला आहे. तर तालुकास्तरावर आधार व्हॅलीडेशन व ‘अपार आयडी’ नोंदणीत मालवण तालुक्याने राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विदयार्थ्यांच्या समग्र शिक्षा अभियान अंतर्गत विदयार्थ्यांचे आधार कार्ड व विदयाथ्यांचे यु-डायस मधील नाव जुळवून व्हॅलीड केले जाते.
‘अपार आयडी’ नोंदणीत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात प्रथम क्रमांक तर तालुका स्तरावर मालवण तालुक्याने राज्यात व्दितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच विदयार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन प्रक्रियेतही मालवण तालुक्याने राज्यात व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे.आधार व्हॅलिड करणे व अपार आयडी तयार करणे यात राज्यात व्दितीय क्रमांक प्राप्त करण्याचा मालवण तालुक्याने 232 शाळांमधील 10573 विदयार्थ्यांपैकी 10542 विदयार्थ्यांचे आधार व्हॅलिड करून 99.71 एवढे काम पुर्ण केले. तर अपार आयडी मध्ये 10573 विदयार्थ्यांपैकी 10499 विदयार्थ्यांचे अपार आयडी जनरेट करून 99.30 % एवढे काम केले. अपार आयडी करताना पालकांची परवानगी आवश्यक असते. त्यानुसार बैठका घेऊन परवानगी प्राप्त केल्या. आधार कार्ड मध्ये नाव पत्ता यात असलेल्या चुका यामुळे अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. यासाठी गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी आधार कार्ड दुरुस्ती बाबत विशेष शिबीरे घेण्यात आली. मेगा अपार दिवस या सवारूपात सर्व शाळात विशेष मोहीम घेण्यात आली. विशेष म्हणजे तालुक्यामध्ये एमआयएस (MIS -Co-ordnator) व डाटा ऑपरेटर ही दोन्ही पदे गेली 10 वर्ष पेक्षा जास्त काळ रिक्त असताना सुद्धा मालवण तालुक्याने गटसाधन केंद्रातील कर्मचारी व तंत्रनेही शिक्षक यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच सर्व शिक्षक यांच्या सोबतीने उल्लेखनीय कामगिरी मालवणने केली आहे.
विभागीय शिक्षण उपसंचालक चौथे यांनी केले विशेष कौतुक
मालवण तालुक्याच्या उल्लेखनीय कामकाजाबद्दल कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक श्री. महेश चोथे यांनी मालवण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. संजय माने व गटसाधन केंद्रातील सर्व कर्मचारी तंत्रस्नेही शिक्षक यांचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच सदर कामकाजासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. गणपती कमळकर, गटविकासअधिकारी शाम चव्हाण, जिल्हा संगणक प्रोग्रॅमर श्री. शत्रुघ्न चव्हाण, तंत्रस्नेही शिक्षक व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व गटसाधन केंद्रातील सर्व कर्मचारी विशेषतः श्री. विकास रुपनर व श्री. स्वप्नील पाटणे विशेषतज्ञ यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. असे मालवण शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
