दत्ता सामंत यांच्याकडून आश्वासनपूर्ती..
⚡मालवण ता.१५-:
मालवण तालुक्यातील तोंडवळी फाटा ते तळाशील हा खड्डेमय झालेला रस्ता सांगितलेल्या दिवसाच्या अगोदर मार्गी लावत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिलेल्या शब्दाची पूर्तता केली. याबद्दल तोंडवळी – तळाशील वासियांनी समाधान व्यक्त केले आहे.
तोंडवळी फाटा ते तळाशील या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली होती. स्थानिक ग्रामस्थांनी या प्रश्नी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे लक्ष वेधले असता त्यांनी १५ मे पूर्वी रस्त्याचे काम मार्गी लावू असा शब्द दिला होता. त्यानुसार या रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आले आहे. याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी श्री. सामंत यांचा सत्कार करत आभार मानले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे, जयप्रकाश परुळेकर, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, डॉ. प्रमोद कोळंबकर, तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर, माजी सरपंच आबा कांदळकर, संजय केळुसकर, सदस्य भूपाल मालंडकर, अनन्या पाटील, सुजाता पाटील, गणेश तोंडवळकर, संजय तारी, श्रीकृष्ण रेवंडकर, विश्वनाथ खवणेकर, विजय पाटील, कल्पेश नाईक, संजय पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
