मालवणात उद्या ‘रॉ- भारतीय गुप्तचर संस्थेची गूढकथा’ विषयावर कार्यक्रम…

⚡मालवण ता.१४-:
भारतीय सेनेने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा कायमचा बिमोड करण्याच्या दिशेने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर दि. १५ रोजी सायंकाळी सहा ते सात या वेळेत रॉक गार्डन येथे रॉ भारतीय गुप्तचर संस्थेची गूढगाथा या विषयावर लेफ्टनंट रवी आमले यांचा विशेष कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास वाचन स्वर नितीन वाळके यांचा असेल. अभियान आम्ही मालवणी यांच्या वतीने चला, वाचू आनंदे! मावळत्या दिनकराच्या साक्षीने या साप्ताहिक उपक्रमांतर्गत या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अभियान आम्ही मालवणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page