⚡मालवण ता.१४-:
छत्रपती शिवाजी महाराज कि जय… धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय… हर हर महादेव… अशा घोषणा देत… भगव्या पताका फडकवत… आज सायंकाळी मालवणात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सकल हिंदू समाजातर्फे मोटरसायकल रॅली काढण्यात आली. कुंभारमाठ येथून मालवण शहर परिक्रमा करून पुन्हा कुंभारमाठ येथे ही रॅली विसर्जित झाली.
शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक, धर्मनिष्ठा आणि देशभक्तीचे प्रेरणास्थान असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी झाला. यावर्षी छत्रपाती संभाजी महाराजांच्या २६८ व्या जयंतीनिमित्त मालवणात सकल हिंदू समाजातर्फे मोटरसायकल रॅली काढण्यात आली. कुंभारमाठ येथील श्री स्वयंभू मंदिर येथून या रॅलीची सुरुवात झाली. यावेळी संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कुंभारमाठ येथून देऊळवाडा – भरड नाका येथून बाजारपेठ मार्गे मालवण शहराची परिक्रमा पूर्ण करून ही रॅली पून्हा कुंभारमाठ येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी विसर्जित झाली. या रॅलीत भगवे फेटे, पारंपारिक वेश परिधान करून आणि भगवे झेंडे फडकवत हिंदू बांधव सहभागी झाले होते.
यावेळी श्री.भूषण साटम यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल मार्गदर्शन केले. बाईक रॅलीत भारताच्या “सिंदूर मिशन” मध्ये भारतीय सैनिकांनी दहशतवादाच्या विरोधात पाकिस्तानवर हल्ला करून केलेली कारवाई, दाखविलेले शौर्य आणि पराक्रम याचेही कौतुक करण्यात आले.
या रॅली मध्ये भाऊ सामंत, भूषण साटम, विलास हडकर, विनय गांवकर, प्रमोद चव्हाण, प्रमोद लंगोटे, दिलीप सांगवेकर, प्रमोद भोगावकर, जीवन भोगावकर, विनोद भोगावकर, गणेश चव्हाण, बाबी चव्हाण, भाऊ साळगावकर, दादा वेंगुर्लेकर, समीर वाटेगांवकर, रत्नाकर कोळंबकर, बाळा माने, सदा करंगुटकर, सुंदर चव्हाण, शैलेश गोवेकर, अमित भगत, श्री. पाताडे, दत्तप्रसाद खानोलकर आदी व इतर सहभागी झाले होते.
