मालवण ता.१४-:
जागतिक परिचारिका दिनानिमित्त लायन्स क्लब मालवण तर्फे मालवण ग्रामीण रुग्णालय व रेडकर हॉस्पिटलला भेट देऊन तेथे कार्यरत असलेल्या परिचारिकांना गुलाबपुष्प आणि मिठाई देवून त्यांच्याठायी असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
ज्यावेळी आपण हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा जन्मापासून मरेपर्यंत एक नर्स आपल्याला आपल्या आरोग्य सुधरविण्यासाठी विविध प्रकारे मदत करीत असते, त्यांचे आम्ही नेहमीच ऋणी आहोत, जगातील सर्व नर्सेसना चांगले आरोग्य लाभावे, अशा शुभेच्छा यावेळी मालवण लायन्स क्लबचे अध्यक्ष एमजेएफ लायन महेश अंधारी यांनी दिल्या.
यावेळी लायन्स क्लबच्या सेक्रेटरी फेनी फर्नांडेस, लायन्स सदस्य उमेश शिरोडकर, ग्रामीण रुग्लायच्या ज्ये ष्ठ परिचारिका विद्या सावंत -पाटील, परिचारिका शीतल तसेच ग्रामीण रुग्णालयातील कामगार वृंद, तसेच रेडकर हॉस्पिटल येथील प्रमुख परिचारिका मेरलिन मेंडिस व इतर परिचारिका आणि कामगार वृंद उपस्थित होते.