राज्यस्तरीय गुरुकुल प्रज्ञा परीक्षेत मोरगाव नं.१ चे चार विद्यार्थी चमकले…

⚡बांदा ता.२९-: गुरूकुल एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय गुरूकुल प्रज्ञा परीक्षेत जि.प.पू.प्राथमिक शाळा मोरगाव नं.१मधील चार विद्यार्थ्यांनी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत चमकदार कामगिरी केली या परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून इयत्ता पहिलीतील तनिष्का गोरड राज्यात तिसरी, अयांश कदम जिल्ह्यात पहिला व राज्यात सहावा, नित्या सातार्डेकर जील्ह्यात चौथी व राज्यात नववी व इयत्ता दुसरीतून मेधांश पिरणकर- जिल्ह्यात चौथा व राज्यात नववा या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मेडल व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
मोरगाव केंद्रशाळेतील या यशस्वी विद्यार्थ्यांचे‌ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय ठाकुर उपाध्यक्ष देविदास पिरणकर मुख्याध्यापक भाग्यश्री कुबल पदवीधर शिक्षक ज्ञानेश्वर सावंत सर, मणिपाल राऊळ सर यांनी अभिनंदन केले असून या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षिका सौ स्वाती पाटील व पालकांचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page