बांदा पानवळ येथे महावितरणचा विद्युत खांब हा धोकादायक…

बाळा आकेरकर: त्वरित बदलण्याची केली महावितरण कडे मागणी..

⚡बांदा ता.२८-: बांदा पानवळ येथे महावितरणचा विद्युत खांब हा धोकादायक स्थितीत कलंडला असून तो केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहे. याबाबत माजी सरपंच बाळा आकेरकर यांनी लक्ष वेधले असून अपघात टाळण्यासाठी लवकरात लवकर हा खांब बदलावा अशी मागणी केली आहे.

पानवळ येथे हा खांब धोकादायक स्थितीत उभा आहे. हा खांब कोसळल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे हा खांब तात्काळ येथून हटवावा व त्याजागी नवीन खांब उभा करावा अशा मागणी त्यांनी केली आहे.
You cannot copy content of this page