गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत भंडारी प्राथमिक शाळेचा नील मोरजकर राज्यात तिसरा…

⚡मालवण ता.२८-:
मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या गुरुकुल प्रज्ञा शोध (GTS) परीक्षेत मालवण येथील भंडारी ए. सो. प्राथमिक शाळेचा विद्यार्थी नील शशिकांत मोरजकर याने राज्यात तिसरा क्रमांक पटकवला आहे. तसेच श्रीनिधी युवराज तारी हिने राज्यात दहावा व जिल्ह्यात पाचवा, तर श्रावणी भूपेश गोसावी हिने राज्यात चौदावा आणि जिल्ह्यात व तालुक्यात चौदावा क्रमांक मिळवला आहे.

गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेला भंडारी प्राथमिक शाळेतून पाच विद्यार्थी बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे भंडारी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटकर, चेअरमन सुधीर हेरेकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, भंडारी हायस्कुल मुख्याध्यापक हणमंत तिवले, प्राथमिक शाळा मुख्याध्यापक भूपेश गोसावी, सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page