⚡बांदा ता.२३-: जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आज बांदा शहरात हिंदू एकता मंचच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी या हल्ल्याला समर्थन देणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या झेंडा जाळण्यात आला.
सुरुवातीला या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्याना श्रद्धांजली वाहण्यात आली. वीरेंद्र आठलेकर व नीलेश सावंत यांनी मनोगत व्यक्त करत या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. यावेळी पाकिस्तान विरोधी घोषणा देण्यात आल्या.
यावेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, सिद्धेश पावसकर, गुरु कल्याणकर, शैलेश केसरकर, नीलेश नाटेकर, बाबा काणेकर, जय पटेकर, संदेश सावंत, ज्ञानेश्वर येडवे, नितेश पेडणेकर, मराठा समाज अध्यक्ष विराज परब, नीलेश मोरजकर, प्रसाद गायतोंडे, दाजी करंबळकर, आत्माराम बांदेकर, दीपक गोवेकर, संदीप नार्वेकर, हेमंत दाभोलकर, दिवाकर मावळणकर, नंदू केळुस्कर, सुनील धामापूरकर, शिवराम देसाई आदिसह हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो:-
बांदा येथे पहलगाम हलल्याचा निषेध व्यक्त करताना हिंदू एकता मंचाचे कार्यकर्ते. (छायाचित्र – नीलेश मोरजकर)
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आज बांदा शहरात हिंदू एकता मंचच्या वतीने निषेध…
